१०९०० एमएएच बॅटरीचा नवा फोन

yooa
आजकाल स्मार्टफोनच्या दुनियेत बडा स्क्रीन, फास्ट प्रोसेसर याला अधिक महत्त्व दिले जात असताना फोनसाठी महत्त्वाची असलेल्या बॅटरीच्या क्षमतेकडे फारसे लक्ष दिले जात नाही असे दिसून येत आहे. मात्र या फ्लॅगशीप स्मार्टफोन मालिकेत दमदार बॅटरीच्या फोनचे आगमन झाले आहे. वायएएओ कंपनीने त्यांचा नवा सिक्स थाऊजंड प्लस या नवा फोन १०९०० एमएएचच्या बॅटरीसह लाँच केला आहे. तो जेडी डॉट कॉम वर लिस्ट केला गेला आहे.

प्रीसेलसाठी चायनीज वेबसाईट जिगडाँगवर तो उपलब्ध असून सध्या हा फोन फोन सध्या चीनमध्येच मिळणार आहे. त्याची किंमत १४५० युआन म्हणजे साधारण १४५०० रूपये आहे. या फोनसाठी ५.५ इंची एचडी टीएफटी डिस्प्ले, १ जीबी रॅम, १६ जीबी इंटरनल मेमरी ती मायक्रो कार्डच्या सहाय्याने ६४ जीबी पर्यंत वाढविण्याची क्षमता, १३ एमपीचा रियर तर ५ एमपीचा फ्रंट कॅमेरा दिला गेला आहे. ड्युअल सिमचा हा अँड्राईड फोन फोरजी एलटीईला सपोर्ट करतो.

Leave a Comment