५०० रुपयांच्या रिचार्जवर ६०० रुपयांचा टॉकटाईम

telenor
नवी दिल्ली : बँका तसेच एटीएमच्या बाहेर नोटाबंदीदरम्यान मोठ्या रांगा अद्याप कमी झालेल्या नाहीत. ५०० रुपयांच्या काही लोकांकडे अजूनही नोटा आहेत ज्या ते बदलू शकत नाहीत. यातच एक अशी बातमी आली आहे ज्याद्वारे तुम्ही ५०० रुपयांच्या बदल्यात ६०० रुपय़े मिळवू शकता. बंद झालेल्या ५०० रुपयांच्या नोटावर टेलिकॉम कंपनी टेलिनॉर कंपनीने ऑफर सुरु केली आहे. या ऑफरअंतर्गत ५०० रुपयांच्या जुन्या नोटेच्या रिचार्जवर तुम्ही ६०० रुपयांचा टॉकटाईम मिळवू शकता.

आपल्या निवेदनात कंपनीने म्हटले आहे की, सरकारने बंदी घातलेल्या ५०० रुपयांच्या रिचार्जवर अतिरिक्त टॉकटाईम दिला जाईल. यासोबतच कंपनीने सात रुपयांचे विशेष रिचार्ज कुपनही सुरु केले आहे. ज्यात २८ दिवसांसाठी एका कॉलसाठी २५ पैसे प्रति मिनिट देण्यात आले आहेत.

Leave a Comment