२२ वर्षीय हॅकरने हॅक केले मोदी अॅप

hacker
मुंबई – पतंप्रधान नरेंद्र मोदी यांचे नरेंद्र मोदी मोबाईल अॅपमधील त्रुटींना एका युवा डेव्हलपरने प्रकाशात आणले आहे. हे अॅप सुरक्षित नाही, जे ५ ते १० करोड वापरकर्त्यांचा डेटा सुरक्षित ठेवू शकत नसल्याचे या डेव्हलपरचे म्हणणे आहे. या अॅपची देखभाल नरेंद्र मोदी आणि त्यांची टीम करते आणि हे केंद्र सरकारचे अधिकृत अॅप नाही आहे. या अॅपची सुरक्षितता कोणीही सहज तोडू शकतो.

मुंबईतील २२ वर्षीय डेव्हलपर जावेद खत्रीने याबाबत ट्विट करून माहिती देताना म्हटले आहे की, मी मोदींच्या अॅपची सुरक्षा भेदली आहे आणि मी याची माहिती देत आहे. त्याचबरोबर जावेदने असे देखील म्हटले आहे की हॅकिंगच्या मागे माझा कोणताही वैत उद्देश नसून या अॅपची देखभाल करणाऱ्यांना मी एवढेच दाखवून देऊ इच्छित आहे की तुमचे अॅप हे सुरक्षित नाही. याबाबत जावेदने संबंधित टीमशी संपर्क देखील साधला होता पण त्याला कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.

Leave a Comment