रिटेल दुकानांमधुन मिळणार दोन हजार रुपये

hdfc
मुंबई- ग्राहकांसाठी खासगी क्षेत्रातील एचडीएफसी बँक नवी ऑफर सुरु करणार असून नोटाबंदीच्या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर या ऑफर अंतर्गत तुम्ही आता रिटेल स्टोअरमधूनही पैसे काढू शकता.

चलनातून ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा बंद झाल्यानंतर बँका आणि एटीएमबाहेर ग्राहकांच्या लांबच लांब रांगा लागत आहेत. ग्राहकांना एचडीएफसीने स्वाईप मशिनच्या धर्तीवर रिटेल दुकानांमधून पैसे काढण्याची सुविधा दिली आहे. एचडीएफसी बँकेने परिपत्रक काढून यासंदर्भात माहिती दिली आहे. महानगरातील ५० पेक्षा जास्त मोठ्या दुकानांमध्ये डेबिट कार्ड स्वाईप करुन ग्राहक दोन हजार रुपये काढू शकतात, असे एचडीएफसी बँकेतर्फे सांगण्यात आले आहे.

दुकाने, मॉल्समधल्या स्वाईप मशिन्समधूनही दोन हजार काढा. ही सुविधा फक्त एचडीएफसी बँकेच्याच नाही तर इतर बँकांच्या ग्राहकांना सुध्दा उपलब्ध असेल. एचडीएफसी बँकेने फेडरेशन ऑफ रिटेल ट्रेडर्स वेलफेअर असोसिएशन या दुकान मालकांच्या संघटनेसोबत टायअप केले आहे. रुपम, बेन्झर, अमरसन्स, कलानिकेतन, प्रेमसन्स, एशियाटिक, लिबाज, सिझन, मेट्रो, कॅटवॉक आणि मोची या दुकानातून ग्राहक डेबिट कार्ड स्वाईप करुन पैसे काढू शकतात.

Leave a Comment