भारतात दाखल झाला वनप्लस ३ टी

oneplus
नवी दिल्ली – वनप्लस या कंपनीने भारतीय बाजारपेठेत वनप्लस ३ टी हा अत्याधुनिक स्मार्टफोन सादर केला असून ६४ जीबी स्टोरेज क्षमता असणा-या मॉडेलची किंमत २९,९९९ रुपये आणि १२८ जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत ३४,९९९ रुपये आहे. कंपनीकडून भारतात दाखल करण्यात आलेल्या फोनपैकी हा सर्वात महाग फोन ठरला आहे. ऍमेझॉन या ई-व्यापारी संकेतस्थळावर १४ डिसेंबरापासून हा स्मार्टफोन खरेदीसाठी उपलब्ध होईल.

हा स्मार्टफोन गेल्या महिन्यात आंतरराष्ट्रीय पातळीवर लॉन्च करण्यात आला होता. वनप्लस ३ या फोनची ही सुधारित आवृत्ती आहे. वनप्लस ३ टीच्या ६४ जीबी प्रकारातील स्मार्टफोनचे पुढील महिन्यापासून भारतात उत्पादन घेण्यास सुरुवात होईल असे कंपनीने म्हटले. ऍल्युमिनियम मेटल युनिबॉडी असणा-या या स्मार्टफोनमध्ये कॉर्निंग गोरिल्ला ग्लास ४चे संरक्षण देण्यात आले आहे. याव्यतिरिक्त या स्मार्टफोनमध्ये डॅश चार्जिंग, युएसबी 2.0 टाईप-सी, फ्रन्ट फेसिंग फिंगरप्रिन्ट स्कॅनर, ब्लुटुथ ४.२, एनएफसी अशा अत्याधुनिक सुविधा आहेत.

Leave a Comment