नोकियाचा स्मार्टफोन होणार पुढील वर्षी लाँच

nokia
हेलसिंकी : लवकरच मोबाईलच्या जगात प्रसिद्ध ब्रँड नोकिया पुन्हा प्रवेश करणार असून नोकियाचा नव्या जनरेशनचा स्मार्टफोन पुढील वर्षी लाँच होणार आहे.

याबाबतची माहिती फिनलँडची कंपनी एचएमडी ग्लोबलने दिली असून लीक रिपोर्टनुसार, नोकियाचे डी१सी स्मार्टफोन दोन पर्यायांत उपलब्ध असतील. एक ५ इंचाचा तर दुसरा ५.५ इंचाचा असेल. तसेच २ आणि तीन जीबी रॅम हे पर्याय असतील. दोन्ही स्मार्टफोनमध्ये १६ जीबी इंटरनल मेमरी असेल. एका स्मार्टफोनमध्ये १६ मेगापिक्सेल रेयर कॅमेरा असेल तर दुसऱ्या स्मार्टफोनमध्ये १३ मेगापिक्सेल कॅमेरा असेल. तर सेल्फी कॅमेरा ८ मेगापिक्सेल असेल. नोकियाच्या या आगामी स्मार्टफोनमध्ये क्वालकॉमचे स्नॅपड्रॅगन ८२० अथवा ८२१ प्रोसेसर असू शकते. हा नवा स्मार्टफोन वॉटरप्रूफ असणार आहे.

Leave a Comment