३४४ औषधांवरील बंदी न्यायालयाने उठवली

medicine
नवी दिल्ली – सरकारने सर्दी, डोकेदुखी दूर होण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या व्हिक्स अॅक्शन ५०० आणि कोरेक्स कफ सिरफ, डीकोल्डसह ३४४ औषधांवर घातलेली बंदी दिल्ली उच्च न्यायालयाने उठवली असून न्यायालयाने सरकारच्या निर्णयावर ताशेरे ओढत घेतलेला निर्णय योग्य नसल्याचे मत नोंदवले. न्यायालयाने हा निर्णय हे औषध बनवणाऱ्या कंपन्यासमवेत आरोग्य क्षेत्रातून दाखल झालेल्या ४५४ याचिकांवर निकाल देताना दिला. याच वर्षी मार्च महिन्यात केंद्र सरकारने व्हिक्स अॅक्शन ५००, डी कोल्ड आणि कोरेक्स कफ सिरफसह सुमारे ३४४ औषधांवर बंदी घातली होती.

या प्रकरणीची सुनावणी करताना न्यायालयाने २ जूनला निकाल राखीव ठेवला होता. न्यायालयाने फायजर, ग्लेनमार्क, प्रॉक्टर अँड गॅम्बलर, सिप्ला आणि काही स्वंयसेवी संस्थांच्या याचिकांवर हा निकाल दिला. या ३४४ औषधांवर बंदी घालताना केंद्र सरकारने नियमांकडे दुर्लक्ष केल्याचे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले. केंद्र सरकारने १० मार्च रोजी या औषधांवर बंदी घातली होती. तर न्यायालयाने १४ मार्च रोजी या बंदीला स्थगिती दिली होती. फिक्स्ड डोस कॉम्बिनेशनचा रोगप्रतिकारक शक्तीवर विपरीत परिणाम होत असल्याचे सरकारने म्हटले होते.

सरकारने हा आरोग्य विभागाकडून कोणतीही परवानगी न घेता दोन किंवा अधिक औषधे एकत्र केल्यामुळे निर्णय घेतला होता. या औषधांमुळे लोकांच्या आरोग्यावर परिणाम होत असल्याचे सरकारने म्हटले होते. बंदी घालण्यात आलेले बहुतांश औषधे अशी होती की, जी डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय लोकांना औषध दुकानातून घेता येत होती. त्याचबरोबर या औषधांच्या बेसुमार जाहिरातीमुळे नागरिकांमध्ये ती लोकप्रिय झाली होती. निमेस्युलाइड आणि डायक्लोफिनॅक यांचा वापर करून तयार केलेल्या वेदनाशामक गोळीमुळे मूत्रपिंड निकामी होण्याचा धोका असतो. निमेस्लुलाइड, सेटीरिझिन आणि कॅफीन हेदेखील असेच भयंकर संयुक्त औषध आहे. अतार्किक, परिणामांचा अभ्यास न केलेल्या व अवयवांना घातक असलेल्या अशा औषधांवर बंदी घालायलाच हवी, असे वैद्यकशास्त्रातील काही तज्ज्ञांनी बंदीनंतर मत नोंदवले होते.

या औषधांवर बंदी घातली होती – डी कोल्ड टोटल, कोरेक्स कफ सिरफ, व्हिक्स अॅक्शन ५००, क्रोसिन कोल्ड अँड फ“लू, डीकोल्ड टोटल, ओफलोक्स, डोलो कोल्ड, चेरीफोफ, डी कोफ, सुमारे, कफनील, पॅडियाट्रिक सिरफ टी ९८, टेडीकॉफ जेसी ३४४ एफडीएस सारख्या औषधांवर बंदी घालण्यात आली होती. तेव्हापासून बाजारात ही औषधे मिळत नव्हती.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment