सोन्या-चांदीची झळाळी मंदावली

gold
नवी दिल्ली : नोटबंदीचा सर्वाधिक फटका सराफा बाजाराला बसताना दिसत असून १५०० रुपयांनी सोन्याचे भाव घसरले असून २९,३५० रुपयांवर सोन्याचा दर पोहोचला आहे. यादरम्यान चांदीच्या किंमतीत देखील घट झाली आहे. चांदीचे दर २२०० रुपये प्रतिकिलोने घसरले आहेत. चांदीचे दर ४१,४३५ रुपयांवर पोहोचला आहे. १० नोव्हेंबरला सर्राफा व्यापाऱ्यांवर आयकर विभागाने छापा मारल्याच्या विरोधात सराफा व्यापाऱ्यांनी २७ नोव्हेंबरपर्यंत दुकानं बंद ठेवली होती.

नोटबंदीनंतर सर्राफा बाजाराला हा फटका काम बंद ठेवल्यामुळे देखील बसला आहे. नोटबंदीआधी ७ नोव्हेंबरला सोने ३०,८५० रुपये तर चांदी ४३,६०० रुपये किलो होती. पुढच्या दिवशी चांदी वाढून ४३,८५० रुपये किलो झाली. तर सोने ३१,७५० रुपये तोळा झाले. ८ नोव्हेंबरच्या संध्याकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ५०० आणि १००० च्या नोटा रद्द केल्या आणि सराफा बाजाराला मोठा फटका बसला. नोटबंदीनंतर ५०० आणि १००० च्या जुन्य़ा नोटा चालवल्या जात असल्याच्या माहितीनंतर आयकर विभागाने अनेक ठिकाणी छापे मारले. सराफा व्यापाऱ्यांनी या विरोधात १७ दिवस दुकाने बंद ठेवली.

नोटबंदीनंतर सोन्याच्या विक्री ८० टक्क्यांनी घसरली. सोने खरेदी करताना लोक विचार करत आहेत. १६ दिवसानंतर सर्राफा बाजार उघडल्यानंतर १७५० रुपयांनी सोन्याच्या किंमती पुन्हा घसरल्या. गेल्या ३ दिवसात देखील सोन्याच्या किंमतीत घट पाहायला मिळाली.

Leave a Comment