नोटबंदीनंतर जाहिरात क्षेत्रावर एम वॉलेटची चलती

mwalle
नोटबंदी जाहीर झाल्यानंतर जाहिरात क्षेत्रात अचानक डिजिटल पेमेंट सेवा कंपन्या व सरकारी, खासगी बँकांची एम वॉलेट अग्रभागी झळकू लागली असून एकेकाळी जाहिरात क्षेत्रावर वर्चस्व असलेल्या ऑटो, ई कॉमर्स व ग्राहकोपयोगी वस्तू कंपन्यांची पिछेहाट झाल्याचे दिसून येऊ लागले आहे. जाहिरात तज्ञांच्या मते मनी वॉलेटची वाढती मागणी हेच त्यामागे मुख्य कारण आहे. पेटीएम, मोबिक्वीक, फ्री चार्ज व पेयू ई वॉलेट यांच्या मागणीत चांगलीच वाढ नोंदविली गेली आहे.

अर्थात या कंपन्या देशात सर्वांपर्यंत पोहोचता यावे यासाठी ३६० डिग्री मार्केटिग व ब्रँडींग करून आलेल्या संधीचा फायदा उठवू पाहात आहेत. या कंपन्यांनी त्यांच्या जाहिरात खर्चात सरासरी १० टक्के वाढ केली आहे. पेटीएमच्या जाहिराती वर्तमानपत्रांच्या पहिल्या पानावर झळकू लागल्या आहेत व वर्ष २०१६-१७ साठी त्यांनी जाहिरात बजेट ६०० कोटींवर नेले असल्याचेही सांगितले जात आहे. मोबिक्विकनेही त्यांचे बजेट ३० कोटींवर नेले असून हे या वर्षासाठी तिपटीहून अधिक आहे. बँकांनीही त्यांच्या डिजिटल वॉलेटच्या जाहिराती मोठ्या प्रमाणावर द्यायला सुरवात केली आहे.

Leave a Comment