मॅग्नेटिक मॅन अरूण रायकर

arun
मध्यप्रदेशातील सागर जिल्ह्यातील अरूण रायकर प्रथमदर्शनी अगदी सर्वसामान्य माणसाप्रमाणेच दिसत असले तरी ते तसे नाहीत. लोखंडाला आकर्षून घेण्याची अद्भूत शक्ती त्यांच्यापाशी असून त्यामुळे ते मॅग्नेटिक मॅन म्हणून देशभरात प्रसिद्धीस आले आहेत. त्यांच्या अंगावर लोखंडाच्या वस्तू आपोआप चिकटतात. अर्थात पूर्वी अगदी कमी प्रमाणात असलेली ही चुंबकशकती दिवसेनदिवस वाढत चालली आहे. आता तर ते ५-५ किलोच्या वस्तूही आकर्षून घेऊ शकतात व हात न लावता उचलू शकतात

रायकर यांच्या म्हणण्यानुसार त्यांच्या शरीरातून विशेष तरंगलहरी येतात व त्यामुळे लोखंडाच्या वस्तू त्यांच्याकडे खेचल्या जातात. प्रथम लहान लहान चमचे त्यांच्या अंगावर चिकटत असत. छाती, पोट व कमर या भागात ही चुंबकशक्ती अधिक प्रमाणात असल्याचेही ते सांगतात. गल्लीतून जाताना लहान लहान मुले त्यांच्या अंगावर लोखंडाच्या वस्तू चिकटवितात. फार पूर्वी रायकर यांना ही शक्ती म्हणजे शाप वाटत असे मात्र आता त्यांची भावना बदलली असून त्यांनी या संदर्भात लिम्का बुक व गिनीज बुकमध्ये आपले नांव झळकविण्याची तयारी केली आहे.

लिम्का बुककडून त्यांच्या या चमत्काराचे व्हिडीओ मागविले गेले आहेत व गिनीज बुककडून अजून कोणताही प्रतिसाद आलेला नाही असे रायकर सांगतात. डॉक्टरांच्या मते रायकरांच्या शरीरात आलेली ही शकती कधीतरी कमी होऊ लागेल व कदाचित एखादेवेळी ती पूर्ण नाहीशीही होऊ शकेल.

Leave a Comment