मार्च पर्यंत ‘जिओ’ फुकट

jio
मुंबई : आज आणखी एक मोठी घोषणा रिलायंस जिओ संबंधित झाली असून रिलायंस इंडस्ट्रीजचे चेअरमन आणि मॅनेजिंग डायरेक्टर मुकेश अंबानी यांनी ४ डिसेंबरपासून नव्या युजर्सला देखील फ्री सेवा देण्यात येणार असून डेटा, वॉईस सेवा पूर्णपणे फ्री देण्यात येणार असल्याची घोषणा केली आहे.

३१ डिसेंबरपर्यंत जिओची पहिली फ्री सेवा ऑफर होती. पण आधीच्या ग्राहकांना देखील आता ही सेवा देखील ३१ मार्च २०१७ पर्यंत मोफत देण्यात आली आहे. रिलायंसने आधी म्हटले होते की, डिसेंबरनंतर प्लान पॅकेज जाहीर केले जाणार आहेत. पण सध्या तरी ३१ मार्चपर्यंत रिलायन्सने ग्राहकांना खूशखबर दिली आहे.

Leave a Comment