या गावासाठी भारताने पाकवर कुर्बान केली १२ गांवे

hussain
पंजाबच्या फिरोजपूर जिल्ह्यातील हुसैनीवाला गावासाठी भारताने शेजारी देश पाकिस्तानला १२ गावे दिली आणि तरीही हा सौदा महागात पडला नाही कारण राष्ट्रभक्ती व देशप्रेमाची किंमत कशातच होऊ शकत नाही. या गावाचे वैशिष्ठ म्हणजे वर्षभरच सतत येथे काही ना कांही घडत असते मग तो स्वातंत्र्यदिवस असो, गणतंत्र दिवस असो व शहीद दिवस असो. भारत पाक सीमेवरचे हे गांव सतलज नदीच्या एका तीरावर आहे व दुसर्‍या तीरावर आहे पाकिस्तानातले गेंदासिंहवाला गाव. हुसैनवाला गावाची हवाच मुळी राष्ट्रभक्ती व देशप्रेमाने भारलेली आहे त्यामुळे या गावाला जेव्हा शक्य असेल तेव्हा भेट दयायलाच हवी.

भारताच्या स्वातंत्र्यासाठी बलीदान करणार्‍या शहीदांची संख्या खूपच मोठी आहे. त्यातलेच भारतीयांच्या गळ्यातले ताईत बनलेले शहीद भगतसिंग, राजगुरू व सुखदेव यांच्यावर २३ मार्च १९३१ साली या गावातच अंत्यसंस्कार करण्यात आले होते. त्यांचा अन्य एक साथीदार बटुकेश्वर दत्त यालाही त्याच्या अंतिम इच्छेनुसार १९६५ साली निधनानंतर येथेच अग्नीच्या स्वाधीन केले गेले. इंग्रज काळात संसदेत भगतसिंगांनी जे बॉम्ब फेकले त्यावेळी बटुकेश्वरही त्यांच्या सोबत होते.

hussain1
हे गांव फाळणीच्या वेळी पाकिस्तानच्या ताब्यात गेले होते मात्र भारतवासियांच्या शहीद प्रेमामुळे भारत सरकारने १९६० च्या दशकात अन्य १२ गांवे पाकिस्तानला देऊन हे गांव परत ताब्यात घेतले. त्यानंतर येथे १९६८ साली राष्ट्रीय शहीद स्मारक विकसित केले गेले. वाघा बॉर्डरप्रमाणेच येथेही रिट्रीट सेरेमनी साजरा होतो व तो पाहण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दीही होते. १९७२ च्या लढाईत पाक सैन्याने या गावाचे मोठे नुकसान केले होते मात्र माजी राष्ट्रपती व पंजाबचे तत्कालीन मुख्यमंत्री ग्यानी झैलसिंग यांनी १९७३ मध्ये हे गांव पुन्हा विकसित केले.

गेल्या मार्चमध्ये पंतप्रधान मोदींनी या गावाला भेट देऊन शहीदांना श्रद्दांजली अर्पण केली होती. गेल्या तीस वर्षात प्रथमच शहीदांना श्रद्धांजली वाहण्यासाठी भारताचे पंतप्रधान या गावात आल्याचे सांगितले जाते.

Leave a Comment