मोटोरोला एम भारतात लवकरच

motoro
लेनोवोच्या मेाटोरोलाने त्यांचा मोटोरोला एम हा मेटल बॉडीवाला पहिला स्मार्टफोन भारतात लवकरच येत असल्याचे जाहीर केले आहे. चीनमध्ये हा फोन या महिन्याच्या सुरवातीला लाँच झाला आहे. या फोनची चीनमधली किंमत १९९९ यूआन इतकी असून भारतातही तो साधारण त्याच किंमतीला म्हणजे १९९०० रूपयांत मिळेल असेही संकेत दिले गेले आहेत.

या फोनसाठी ५.५ इंची फुल एचडी २.५ डी आयपीएस डिस्प्ले, ४जीबी रॅम, ३२ जीबी इंटरनल मेमरी ती कार्डच्या सहाय्याने १२८ जीबी पर्यंत वाढविण्याची सुविधा, अँड्राईड मार्शमेलो ६.० ओएस, ड्युल सिम, हायब्रीड सिम स्लॉट दिला गेला आहे. फोनचा बॅक कॅमेरा १६ एमपीचा व ड्युअल एलईडी फ्लॅशसह असून फ्रंट कॅमेरा ८ एमपीचा आहे. ३०५० एमएमएच ची क्विक चार्ज टेक्नॉलॉजीसह बॅटरी असून त्यावर स्प्लॅश प्रूफ नॅनो कोटिंग आहे. कनेक्टिव्हीटीसाठी फोरजी, व्होल्ट, वायफाय, जीपीएस, एनएफसी, यूएसबी टाईप सी पोर्ट अशी ऑप्शन्स आहेत.

Leave a Comment