फेसबूकची भारतात चारपट कमाई

facebook
मुंबई : सोशल मीडियामध्ये फेसबूक अग्रेसर आहे. लहानापासून मोठ्यापर्यंत आजच्या घडीला फेसबुकचा वापर करीत आहे. पण तुम्हाला फेसबूकची कमाई किती आहे हे जाणून घ्यायला नक्की आवडेल. भारतात सध्या फेसबूक चार पट्टीने कमाई करत आहे. यावर्षी कंपनीच्या कमाईत रजिस्ट्रार ऑफ कंपनीनुसार ४३ टक्क्यांची वाढ झाली आहे. याबाबत इकॉनोमिक टाइम्सने दिलेल्या माहितीनुसार यावर्षी १६ रुपये प्रति यूजरच्या दराने फेसबूकने १७७ कोटींची कमाई केली तर मागील वर्षी कंपनीने ९ रुपये प्रती यूजरच्या दराने १२३ कोटींची कमाई केली होती.

फेसबूक अमेरिकेनंतर सर्वात जास्त भारतात वापरले जाते. ६१० रुपये प्रती यूजरच्या दराने भारतात फेसबूकने कमाई मोठी कमाई केली. फेसबूक नव्या स्कीम सर्व्हिसच्या माध्यमातून अजून वाढत आहे. उदाहरण म्हणजे, एक्सप्रेस वायफाय सर्विस. याची टेस्टिंग लोकल इंटरनेट सर्विस प्रोवाइडर्ससोबत देखील पूर्ण झाली आहे. यामुळे फेसबूकचा फायदा होता आणि युजर्स देखील वाढतात. न्यूयॉर्कच्या मार्केट रिसर्च कंपनीने ई मार्केटरनुसार २०१५ मध्ये भारतात काही जाहिरातींच्या १२.६ टक्के डिजिटल मीडियाला दिले. पण २०१७ मध्ये हे वाढून १४.३ टक्के झालं आता ते १ बिलियन डॉलरचा आकडा पार करु शकतात.

सोशल मीडिया कंपनीला डिजिटल मीडियामध्ये जाहिरातीने मोठा फायदा होतो. सोशल मीडियाच्या नावावर भारतात सध्या सर्वात जास्त फेसबूक वापरले जात असल्यामुळे फेसबूकचे युजर्स जसे वाढणार तसे फेसबूकचा फायदा वाढत राहणार आहे. फेसबूकच्या भारत आणि दक्षिण आशियाच्या मुख्य अधिकारी उमंग बेदी यांनी म्हटले की, भारत फेसबूकच्या वाढत्या बाजारामधील एक आहे. फेसबूक वापरणाऱ्यांचे प्रमाण भारतात इतर देशांच्या तूलनेत अधिक वाढत आहे. फेसबूक सॅमसंग, गार्नियर, ओला, फोर्ड आणि ड्यूरेक्स सारख्या कंपन्यांसोबत मिळून कँपेन देखील करतात.

Leave a Comment