नोटा बदलण्यासाठीची वेळ वाढवली जाणार नाही

note1
नवी दिल्ली – केंद्र सरकारने बंदी घालण्यात आलेल्या हजार आणि पाचशेच्या नोटा बदलण्यासाठीची वेळ वाढवून देण्याची योजना नसल्याचे स्पष्ट केले आहे.

बँकांतील गर्दी पैसे भरणे आणि जुन्या नोटा बदलून घेण्यासाठी कमी होत नसल्याने सरकार पैसे भरण्यासाठी वेळ वाढवून देण्याची चर्चा होत होती. मात्र, या चर्चेवर सरकारने पडदा टाकला आहे. यानुसार ३० डिसेंबरपर्यंत वेळ वाढवून दिली जाणार नाही, अशी घोषणा आज करण्यात आली. राज्यसभेत विचारण्यात आलेल्या प्रश्नावर केंद्रीय राज्य अर्थमंत्री अरुण राम मेघवाल यांनी लेखी स्वरुपात उत्तर दिले. पैसे बदलने किंवा भरण्याबाबत कोणतेही निवदेन सादर करण्यात आले नाही, असे त्यात नमूद करण्यात आले आहे.

Leave a Comment