सॅमसंग इलेक्ट्राॅनिक्सचे विभाजन होणार

samele
जगातील सर्वात बडी स्मार्टफोन निर्माती कंपनी सॅमसंग इलेक्ट्राॅनिक्सचे दोन कंपन्यात विभाजन केले जात असून ही प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी सहा महिन्यांचा अवधी लागेल असे समजते. कार्पोरेट गव्हर्नन्समध्ये सुधारणा करण्यासाठी परदेशी गुंतवणूकदारांकडून येत असलेल्या दबावामुळे हा निर्णय घेतला गेला आहे असे सांगितले जात आहे. गॅलेक्सी नोट सेव्हन स्मार्टफोनमध्ये उद्भवलेल्या अडचणींमुळे कंपनीत पेच निर्माण झाला आहे व त्यातून कांही तरी मार्ग काढणे कंपनीला भागच होते असे अंतर्गत सूत्रांकडून समजते.

सॅमसंग च्या दोन कंपन्या केल्या जाणार असून त्यातील एक होल्डिंग फर्म असेल तर दुसरीवर प्रॉडक्शन व ऑपरेशन्सची जबाबदारी असेल असे समजते. कंपनीचे उपाध्यक्ष ली जे योंग यांना यामुळे कंपनीवरची पकड अधिक घट्ट करण्यास मदत होईल असाही अंदाज वर्तविला जात आहे. गुंतवणूकदारांच्या मागणीनुसार शेअर होल्डरच्या लाभांशातही प्रती शेअर ३६ टक्के वाढीची घोषणा कंपनीने नुकतीच केली आहे.

Leave a Comment