व्होडाफोन देणार विनामूल्य ४जी सिमसह २ जीबी डेटा विनामूल्य

vodafone
पुणे – व्होडाफोन इंडियाने महाराष्ट्र आणि गोवा परिमंडळात ४जी नेटवर्क सुरू करण्याच्या अखेरच्या टप्प्यात नव्या योजनेची घोषणा केली असून या आकर्षक योजनेअंतर्गत ४जी सक्षम स्मार्टफोनवर विनामूल्य ४जी सिमसह २ जीबी विनामूल्य डेटा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. ४जी स्मार्टफोन ज्या व्होडाफोन ग्राहकांकडे असतील त्यांच्यासाठी ही योजना लागू असणार आहे.

महाराष्ट्र आणि गोवा परिमंडळातील काही शहरांमध्ये पहिल्या टप्प्यात ४जी सेवा सुरू राहणार आहे. एकदाच लागू असलेली २जीबी विनामूल्य डेटा योजना प्रीपेड ग्राहकांसाठी दहा दिवसांकरिता, तर पोस्टपेड ग्राहकांसाठी एका देयक कालावधीसाठी असेल. याबाबत महाराष्ट्र आणि गोवा परिमंडळाचे व्यवसायप्रमुख आशिष चंद्रा म्हणाले, आमच्या १८.६५ लाख ग्राहकांसाठी आगामी काळात नव्या योजना येऊ घातल्या आहेत. सध्या अस्तित्वात असलेल्या नेटवर्कचे आधुनिकीकरण करण्यासाठी व्होडाफोनने गेल्या काही महिन्यांत मोठय़ा प्रमाणात गुंतवणूक केली असून, हे नेटवर्क ऊर्जाकार्यक्षम बनविण्यासाठी प्रगत तंत्रज्ञानाचा वापर केला आहे.

Leave a Comment