महाग होऊ शकतात इलेक्ट्रॉनिक वस्तू !

e
नवी दिल्ली : मोबाईल, टीव्ही, एसी, लॅपटॉप अशा इलेक्ट्रॉनिक वस्तूंना नोटाबंदीचा फटका बसण्याची शक्यता असून रुपयात होणारी घसरण वाढत गेली तर कंज्यूमर ड्युरेबल कंपनी आपल्या उत्पादन किमतींमध्ये ३-५ टक्के वाढ करु शकतात. स्टील, अॅल्युमिनियम सारख्या कच्चामालाच्या किंमतीत रूपयाच्या घसरणीमुळे वाढ होत आहे. त्यामुळे एलजी, सॅमसंग, गोदरेज, व्हिडियोकॉन सारख्या मोठ्या कंज्यूमर ड्युरेबल कंपनी २०१७मध्ये आपल्या वस्तूच्या किंमतींमध्ये वाढ करू शकतात.

ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी अनेक इलेक्ट्रॉनिक कंपन्यानी भरघोस ऑफर दिल्या होत्या. परंतू रूपयात होणारी घसरण सतत वाढत गेली तर उन्हाळ्यात इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदी करण्यासाठी ग्राहकांना जास्त पैसे मोजावे लागणार आहे किंवा विक्रीला उतरती कळा लागण्याची शक्यता आहे. विक्रेत्यांचे म्हणणे आहे की, तीन महिन्यानंतर या निर्णयाचा परिणाम दिसेल. तज्ज्ञांच्या मते, नोटाबंदी निर्णयाचे बाजारावर वाईट परिणाम दिसले परंतु अपेक्षा होती की, इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या किमती कमी होतील.

Leave a Comment