जगातील सर्वाधिक वेगवान सुपरबाईक्स

bike2
तरूणाईत वाढत असलेल्या सुपरबाईक क्रेझची दखल सुपरबाईक उत्पादक कंपन्यांनी घेतली नसली तरच नवल. नवीन वर्षात भारतातही अनेक महागडया, स्वस्त सुपरबाईक बाजारात येत आहेत. त्यात अगदी २ लाखांच्या सुपरबाईकपासून ते लक्षावधी रूपयांच्या किमतींच्या बाईकचा समावेश आहे. मात्र जगातील सर्वाधिक वेगवान सुपरबाईक्स आपल्याला माहिती आहेत काय? नसेल तर ही माहिती तुमच्यासाठीच आहे.

डॉज टॉमहॉक्स ही सुपरबाईक आजघडीला जगातील सर्वात वेगवान सुपरबाईक आहे. तिचे इंजिन ट्रकपेक्षाही मजबूत असून तिचा टॉप स्पीड आहे ताशी ६७५ किमी. या बाईकला चार व्हील्स आहेत व २००३ साली ती बाजारात आली तेव्हापासून आत्तापर्यंत केवळ ९ ते १० गाड्याच विकल्या गेल्या आहेत. ही बाईक ० ते १०० किमीचा वेग अवघ्या १ ते दीड सेकंदात घेते व तिची किंमत आहे ३ ते चार कोटी रूपये.या बाईकला ८.३ लिटरचे व्ही १० एसआरटी डॉज १० इंजिन दिले गेले आहे.

bike1
सझुकी हायाबूशा- सुपरबाईक जगताशी संपर्क ठेवून असणार्‍या बहुतेक सर्वांना या बाईकची माहिती आहे. १३४० सीसीचे इंजिन असलेल्या या बाईकचा टॉप स्पीड आहे ताशी ४०० किमी. अर्थात त्या मानाने तिची किंमत फार जास्त नाही. ती आहे १३ ते १४ लाख रूपये. त्याखालोखाल नंबर लागतो तो एमटीएफ टर्बाईन वाय टू केचा. रोल्स रॉईसच्या या बाईकला २५० सी १८ टर्बोचार्ज शॉफ्ट इंजिन दिले गेले आहे. या बाईकचा टॉप स्पीड आहे ताशी ३६५ किमी पण हिची किंमतही चांगली आहे. ती आहे ९६ लाख रूपये.

चार नंबरवर आहे कावासाकी निजा एच टू आर. या बाईकला ९९८ सीसीचे सुपरचार्ज्ड डीओएचसी इनलाईन चार इंजिन दिले गेले असून तिचा टॉप स्पीड आहे ताशी ३४५.४ किमी. ही ३९.५६ लाख रूपयांत उपलब्ध आहे. तर पाच नंबरवर आहे होंडा सीबीआर ११०० एक्सएक्स सुपर ब्लॅकबर्ड ही बाईक. तिला ११३७ सीसीचे फोर स्ट्रोक इंजिन दिले गेले असून तिचा टॉप स्पीड आहे ताशी ३०५ किमी. किमत आहे ७.३लाख रूपये.

Leave a Comment