मारुती सुझुकीची वॅगन आर फेलिसिटी लाँच

wagon-r
मुंबई – मारुती सुझुकी कंपनीने वॅगन आर कारचे नवे मॉडेल असलेलली वॅगन आर फेलिसिटीचे लिमिटेड एडिशन भारतीय बाजारपेठेत लाँन्च केले असून या लिमिटेड एडिशन असलेल्या कारची दिल्लीतील एक्स शोरुम किंमत ४ लाख ४० हजार रुपयांपासून सुरु होत आहे. LXi आणि VXi या दोन मॉडलमध्ये ही कार उपलब्ध आहे. तर वॅगन आर फेलिसिटी लिमिटेड एडिशनमधील VXi-AMT (O) ची किंमत ५ लाख ३७ हजार रुपये आहे.

याबाबत माहिती देताना मारुती सुझुकी इंडिया लिमिटेडचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर (मार्केटिंग अँड सेल्स) आरएस कल्सी यांनी सांगितले की, वॅगन आर ही गाडी देशातील सर्वात यशस्वी कार ठरलेल्यांपैकी एक आहे. या कारने बाजारात जबरदस्त पकड बनवली असुन आपले एक वेगळे वर्चस्व निर्माण केले आहे. गेल्या पाच वर्षांपासून देशातील टॉप ५ बेस्ट सेलिंग कारच्या लिस्टमध्ये वॅगन आरचे नाव समाविष्ट आहे. ही एक आनंदाची गोष्ट असुन यासाठी आम्ही आता वॅगन आरचे लिमिटेड एडिशन बाजारात उपबल्ध करुन दिले आहे.

कंपनीच्या मते, मारुती सुझुकी वॅगन आर फेलिसिटी एडिशनमध्ये प्रवाशांना कंम्फर्टेबल वाटावे यासाठी खास काळजी घेण्यात आली आहे. कारमध्ये इंटरटेन्मेंट फिचर्स, रिव्हर्स पार्किंग सेंसर (डिस्प्ले सोबत), वॉइस गाइडंस, डबल-डिन ब्लूटूथ म्युझिक सिस्टम, स्पीकर्स, बॉडी ग्राफिक्स सारखे फिचर्स देण्यात आले आहेत. मात्र, या कारच्या इंजिनमध्ये काहीही बदल करण्यात आलेला नाही.