बार्सिलोना मोबाईल काँग्रेसमध्ये येणार नोकियाचा नवा स्मार्टफोन

nokiaf
फिनलंडची नोकिया स्मार्टफोन बाजारात पुनरागमन करत असल्याची बातमी पूर्वीच आली आहे. नोकियाचा नवा फोन कधी येणार यासंदर्भात माहिती आता उपलब्ध झाली असून २०१७ च्या बार्सिलोना मोबाईल काँग्रेसमध्ये नोकियाचा नवा स्मार्टफोन सादर केला जाणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. या फोनची कांही फिचर्सही लिक झाली आहेत. अर्थात हे फोन एचएमडी ग्लोबल किवा तैवानच्या फॉक्सकॉन कंपनीत तयार केले जाणार आहेत.

नोकियाचे फोन टप व स्ट्राँग मानले जातात. नव्या फोनला वॉटरप्रूफ बनविले गेल्याने नोकियाच्या या किर्तीत आणखीच भर पडणार असल्याचे तज्ञांचे मत आहे. वॉटरप्रूफ फोनमुळे नोकियाच्या लोकप्रियतेत भर पडेल असेही सांगितले जात आहे. या फोनसाठी ५.२ किवा ५.५ इंची स्क्रीन. क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ८२० प्रोसेसर, अँड्राईड नगेट ७.० ओएस व ३ जीबी रॅम असेल असे समजते. त्याचबरोबर एसएलआर कॅमेरा तसेच सोनी कॅमेर्‍यात वापरली जाणारी लेन्स असलेला कॅमेरा त्याला दिला जाईल. हँडसेट हायएंड असेल व फोनची फोटेा क्वालिटी शानदार असेल असेही समजते.

Leave a Comment