पॅरिसच्या गांधीजी रेस्टॉरंटला बेस्ट रेस्टॉरंटचा पुरस्कार

pariss
फेडरेशन ऑफ इंटरनॅशनल टूरिझम ने यंदाच्या वर्षाच्या बेस्ट इंडियन रेस्टॉरंट साठी पॅरिसच्या गांधीजी या रेस्टॉरंटची निवड केली असून त्यांना हे अॅवॉर्ड नुकतेच देण्यात आले. रेस्टॉरंटचे मालक अरविंद आहीर हे मुळचे अंकलेश्वर गुजराथ येथले आहेत. दरवर्षी असा पुरस्कार फेडरेशनतर्फे दिला जातो.हा पुरस्कार देताना प्रामुख्याने पदार्थांची चव, पदार्थांची व्हरायटी, साफसफाई, अंतर्गत व बाहेरची सजावट, ग्राहक संख्या तसेच ग्राहकांची मते विचारात घेतली जातात तसेच वर्षभरात किती महत्त्वाच्या व्यक्तींनी येथे भेट दिली तेही विचारात घेतले जाते.

या रेस्टॉरंटला पंतप्रधान मोदींनी डिसेंबरच्या पॅरिस दौर्‍यादरम्यान भेट दिली होती. येथील पदार्थ त्यांना खूपच आवडले होते.त्याचबरोबर बॉलीवूडमधील अनेक सेलिब्रिटी सुटीसाठी फ्रान्समध्ये आले तर या रेस्टॉरंटला आवर्जून भेट देतात. क्रिकेटपटू विरेंद्र सेहवाग यानेही सहकुटुंब इथल्या पदार्थचा आस्वाद घेतला आहे. शिवाय पॅरिस मधील अनेक उद्येाजक, व्यावसायिक व भारतातले अनेक बडे नेतेही येथे येत असतात असे अरविंदभाई यांनी सांगितले. ते म्हणाले आम्ही गुजराथी पदार्थांबरोबरच अन्य पदार्थही ग्राहकांसाठी बनवतो व येथे येणारे बहुतेक सर्व भारतीय जेवणाचे भोक्ते असतात.

Leave a Comment