नोटाबंदीनंतर तीन दिवसांत वाढली आयफोनची विक्री

iphone
नवी दिल्ली : सोन्याची खरेदी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नोटाबंदी जाहीर केल्यानंतर मोठ्या प्रमाणात झाली. मात्र मोदींनी ५०० आणि १०००च्या नोटांवर बंदी जाहीर केल्यानंतर आणखी कशाची विक्री वाढली हे तुम्हाला माहीत आहे का ?

सोन्याच्या विक्रीसोबतच आयफोनच्या विक्रीतही नोटाबंदीनंतर मोठी वाढ पाहायला मिळाली. व्यापाऱ्यांच्या माहितीनुसार नोटाबंदीनंतर तीन दिवसांत तब्बल एक लाखाहून अधिक आयफोनची विक्री झाली. हा आकडा एकूण महिन्यातील विक्रीपैकी तीन चतुर्थांश इतका आहे. आपल्याकडील पैशाचा वापर करण्यासाठी अनेकांनी आयफोनची खरेदी केली. तसेच दुकानदारांनीही जुनी बिले देत या तेजीचा संपूर्ण फायदा उचलला. दिवाळीनंतर महागड्या स्मार्टफोनची विक्री कमी होते. यातच नोटाबंदीनंतर अचानक विक्री वाढल्याचा फायदा दुकानदारांना झाला.

Leave a Comment