जपानी रोबो विद्यापीठ प्रवेश परिक्षेत नापास

japaro
जपानी रोबो तोरोबो कुन याचे देशाच्या प्रतिष्ठित टोक्यो विद्यापीठात प्रवेश घेण्याचे स्वप्न संपुष्टात आले आहे. हा आर्टिफिशल इंटेलिजन्ट रोबो सलग चौथ्या वर्षी विद्यापीठाच्या प्रवेश परिक्षेत नापास झाला आहे. त्यामुळे आता त्याला अन्य उद्योगधंद्यात नोकरी लावण्यासाठी ट्रेंड केले जाणार आहे असे समजते.

जपानमध्ये विद्यापीठ प्रवेशासाठी नॅशनल सेंटर टेस्ट पास व्हावे लागते. तोरोबो हा रोबो २०१३ पासून ही परिक्षा देतो आहे मात्र यंदाही तो ही परिक्षा पास होऊ शकला नाही. या परिक्षेत पाच विषय व त्याच्या आठ चाचण्या असतात. ९५० गुणांच्या या परिक्षेत ८० टक्के गुण मिळाले तरच विद्यापीठ प्रवेशाला तुम्ही पात्र ठरता मात्र तोरोबो केवळ ५१.५ टक्के म्हणजे ९५० पैकी ५२५ गुण मिळवू शकला. गतवर्षीपेक्षा हे गुण १४ ने अधिक आहेत.

Leave a Comment