आयसीआयसीआयचे १०० गावे डिजिटल करण्याचे लक्ष्य

kochhar
नेाटबंदी निर्णयानंतर आयसीआयसीआय बँकेने देशातील १०० गावांना डिजिटल पेमेंट प्रणाली पुरविण्याचे लक्ष्य ठेवले असल्याचे बँकेच्या सीईओ चंदा कोचर यांनी सांगितले. त्या म्हणाल्या देशाच्या दुर्गम भागात आम्ही ही सेवा देण्यास प्राधान्य देणार आहोत. त्याचा फायदा डिजिटल देवघेव व व्यापार उलाढाल वाढण्यासाठी होऊ शकणार आहे. नोटबंदी निर्णयानंतर देशभरात डिजिटल पेमेंट वाढविण्याचा प्रयत्न केला जात असून या मोहिमेत ग्रामीण भागाचाही समावेश आहे.

कोचर म्हणाल्या ग्रामीण भागात ही सेवा देणे हा देशातला सर्वात मोठा ग्रामीण विकास कार्यक्रम आहे. या गावांचा कॅशलेस प्रणालीतून विकास करण्यावर भर दिला जात असून त्यासाठी १०० गावातील १० हजार नागरिकांना प्रशिक्षण दिले जात आहे. त्यानंतर त्यांना बँक कर्ज पुरवठा करणार असून स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यास प्रोत्साहन देणार आहे.

Leave a Comment