लवकरच रस्तेही करणार वीजनिर्मिती

roads
सर्व कांही सुरळीत पार पडले तर नजीकच्या भविष्यात सूर्याच्या उर्जेपासून वीजनिर्मिती करण्याचे काम रस्तेही करू शकणार आहेत. ही वीज संबंधित गावाची किंवा शहराची रोजची विजेची गरज भागवू शकेल. फ्रान्समध्ये असे रस्ते तयार केले गेले असून त्याच्या चाचण्या सुरू आहेत. गेली पाच वर्षे त्यावर संशोधन केले जात होते. त्यामुळे आता लवकरच सौरऊर्जेपासून वीजनिर्मितीचे इलेक्ट्राॅनिक अॅन्व्हेन्यू शहरात प्रत्यक्षात येण्याचा मार्ग मोकळा होत आहे.

फ्रान्सच्या बुईख इंजिनिअरींग ग्रुपची उपकंपनी कोलास एसए यांनी यासाठीची सोलर पॅनल डिझाईन केली आहेत. ही पॅनल अठरा चाकी ट्रकचा भार सहन करू शकतात. सध्या ही पॅनल रस्त्यावर वापरता येण्यायोग्य बनविली जात आहेत. कंपनीचे मुख्य इंजिनिअर फिलिप हर्ल म्हणाले शेतजमिनींचा वापर सौर पॅनलसाठी केला जात आहे त्याऐवजी रस्त्यांचा वापर अधिक सोईचा होणार आहे. आम्ही १०० आउटडोअर साईट तयार केल्या आहेत व टूरोवर गावात या रस्त्यांच्या टेस्ट घेतल्या जात आहेत. गतमहिन्यात २८०० चौरसमीटर रस्त्यावर बसविलेल्या पॅनलमधून २८० किलोवॅट वीज निर्माण झाली व ५ हजार वस्तीच्या गावासाठी ती पुरेशी आहे. अर्थात या पॅनलसाठी सध्या येणारा खर्च जास्त असून तो कमी कसा करता येईल याचे प्रयत्न सुरू आहेत.

Leave a Comment