स्नॅपडीलचे द वेडींग स्टोर -कॅश टंचाईवर उतारा

snapd
अचानक नोटबंदी जाहीर झाल्यामुळे देशभरात होऊ घातलेल्या लग्नघरांत कॅश टंचाई निर्माण झाली आहे. त्यासाठी स्नॅपडील या ई कॉमर्स प्लॅटफॉर्मने मदतीचा हात देऊ केला आहे. कॅशमुळे लग्नाची कोणतीही खरेदी किंवा तयारी थांबू नये यासाठी त्यांनी द वेडिंग स्टोर हा प्लॅटफॉर्म सुरू केला आहे. तेथे लग्नासाठी आवश्यक सार्‍या वस्तू मिळू शकणार आहेत. मग तुम्ही वर्हाूडी असा, वधूवर असा अथवा लग्नाचे पाहुणे असा.

या प्लॅटफॉर्मवर पारंपारिक वेडींग ड्रेसेस, डिझायनर फुटवेअर, एक्सेसरीज, शगुन लिफाफा म्हणून देता येतील अशी ई गिफ्ट कार्डस व अनेक वस्तू उपलब्ध आहेत. गिफ्ट कार्डस ५०० रूपयांपासून सुरू आहेत. पेंटालून, व्हॅन हुसेन, फॅब इंडिया, मेक माय ट्रीप या सारख्या अनेक ब्रँडनी त्या संदर्भात स्नॅपडीलशी टायअप केला आहे. इतकेच नव्हे तर डायनिंग, फिटनेस साठीही गिफ्ट ऑप्शन्स दिली गेली आहेत.

Leave a Comment