टपाल खाती हाऊसफुल्ल

indian-post
नवी दिल्ली – सरकारकडून पाचशे व हजारच्या जुन्या नोटा बंद झाल्यानंतर देशभरातील १.५५ लाख टपाल कार्यालयांमध्ये ३२ हजार ६३१ कोटी रुपयांच्या जुन्या नोटा जमा झाल्या आहेत.

टपाल कार्यालयांनी १० ते २४ नोव्हेंबरदरम्यान ३ हजार ६८० कोटी रुपयांच्या जुन्या नोटा बदलून दिल्या आहेत. याविषयी माहिती देताना टपाल विभागाचे सचिव बी. व्ही. सुधाकर म्हणाले, टपाल कार्यालयांमध्ये १० ते २४ नोव्हेंबर या कालावधीत ५७८ लाख जुन्या नोटा म्हणजेच ३ हजार ६८० कोटी रुपयांच्या नोटा बदलून देण्यात आल्या आहेत. याच काळात टपाल कार्यालयांमध्ये ४३.४८ कोटी जुन्या नोटा म्हणजेच ३२ हजार ६३१कोटी रुपये जमा झाले आहेत. या कालावधीत टपाल कार्यालयांतून ३ हजार ५८३ कोटी रुपये काढण्यात आले आहेत. देशभरात १.५५ लाख टपाल कार्यालये असून, यातील ग्रामीण भागात १.३० लाख, तर शहरी आणि निमशहरी भागात २५ हजार टपाल कार्यालये आहेत.

Leave a Comment