नोटाबंदीवरील मौन उर्जित पटेल यांनी सोडले

urjit-patel
दिल्ली – नोटाबंदीवरील आपले मौन रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर उर्जित पटेल यांनी सोडले असून त्यांनी नोटाबंदीनंतर देशातील स्थितीवर आमची बारीक नजर असल्याचे म्हटले आहेत. आमचा नागरिकांच्या समस्या दूर करण्याचा प्रयत्न आहे.

चलनटंचाईचा आरेाप फेटाळत देशभरातील बँकांमध्ये चलनाची कुठलीच कमतरता नसल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले आहे. नोटाबंदीच्या निर्णयानंतर उर्जित पटेल यांची ही पहिलीच प्रतिक्रिया आहे. सर्वसामान्य नागरिकांना चांगली सुविधा देण्याचा आरबीआयचा प्रयत्न आहे. सर्व परिस्थिती लवकरच नियंत्रणात येईल असा आशावादही त्यांनी बोलून दाखवला. सर्वसामान्यांच्या हाती पैसा लवकर यावा म्हणून नोटांची सातत्याने छपाई सुरू असल्याची माहिती पटेल यांनी या वेळी दिली आहे.

देशात नोटांची कमतरता नाही. बँका एखाद्या मिशनप्रमाणे काम करत असल्याचे त्यांनी सांगितले. नव्या ५०० आणि २००० रूपयांची रचनाच अशा पद्धतीने केली आहे की, त्यामुळे त्याची नक्कल करणे कठीण जाईल. या वेळी गव्हर्नर पटेल यांनी नागरिकांनी डेबिट कार्ड वापरण्याचे आवाहन केले. लोकांनी सुलभ व्यवहारासाठी मोबाइल वॉलेट, डेबिट कार्ड वापरण्यावर भर द्यावा असे ते म्हणाले.

Leave a Comment