शाओमीने आणला व्हॉईस कंट्रोल असलेला वायफाय स्पीकर

speaker
मुंबई – चीनची इलेक्ट्रॉनिक उत्पादक कंपनी शाओमीने नवे स्पीकर लॉन्च केले असून हे स्पीकर Mi Wi-Fi Speaker किंवा Mi Internet Speaker या नावाने लॉन्च करण्यात आले आहेत. या स्पीकर्सवर इंटरनेटवरून किंवा इतरही मार्गाने गाणी वाजवली जाऊ शकतात. चांगल्या स्पीकरच्या शौकीनांसाठी हे स्पीकर फायद्याचे ठरणार आहे.

शाओमी Mi Wi-Fi Speaker मध्ये ४ स्पीकर आहेत, दोन २.५ इंचाचे सब वूफर्स आणि दोन २० कोर ट्वीटर्स लावले गेले आहेत. ही स्पीकर Amlogc 8726M3 Cortex A9 या प्रोसेसरवर चालतात. कनेक्टीव्हीटीबद्दल सांगायचे झाले तर वाय-फाय आणि ब्ल्यूटूथच्या माध्यमातून यावर गाणी वाजवली जाऊ शकतात. जर तुमच्याकडे इंटरनेट नाही आणि तरीही तुम्हाला गाणी ऎकायची आहेत तर यात ८ जीबीचे इंटरनल स्टोरेज देण्यात आले आहे. त्यात तुम्ही गाणी सेव्ह करू शकता आणि ऑफलाईन प्ले करू शकता. यात २.० यूएसबी पोर्ट आणि ३.५ एमएम ऑक्स इनपुट जॅक सुद्धा देण्यात आला आहे.

यास्पीकर बाबत शाओमीने सांगितले की, हे स्पीकर २ कोटी गाण्यांच्या डेटाबेसमधून गाणी सर्च करू शकतात. चीनमध्ये हे स्पीकर १५०० पेक्षा जास्त रेडिओ स्टेशन सर्च करु शकतात. यासोबतच २० लाख स्टोरीटेलिंग स्टेशन आणि १२ अरब ऑडिओबुक्स सुद्धा यातून अ‍ॅक्सेस केले जाऊ शकतात. याला बटन तर आहेतच शिवाय हे स्पीकर व्हॉईसनेही कंट्रोल केले जाऊ शकतात. या स्पीकरमध्ये बॅटरी नाही. कंपनीने या स्पीकर्सची किंमत ४ हजार रूपये इतकी ठेवली आहे. चीनमध्ये याची विक्री सुरू झाली आहे.

Leave a Comment