एफ थ्री ८०० आरसीची स्पोर्टस बाईक आली, हिरोची सुपरबाईक पुढच्या वर्षात

augusta
इटालीच्या बाईक उत्पादक एमव्ही ऑगस्टाने त्यांची लिमीटेड एडिशन स्पोर्टस बाईक एफ थ्री ८०० आरसी भारतात लाँच केली असून या बाईकची किंमत आहे १९.७३ लाख रूपये. विशेष म्हणजे जगभरातील विक्रीसाठी कंपनीने अशा फक्त २५० बाईक तयार केल्या आहेत व त्यातील नऊ बाईक भारतात विक्रीसाठी उपलब्ध आहेत. पुणे, अहमदाबाद व बंगलोर येथील शोरूममध्ये त्या मिळू शकणार आहेत.या बाईकला७९८ सीसीचे थ्री सिलेंडर पॉवरफुल इंजिन दिले गेले आहे. सहा स्पीड गिअरबॉक्सह असलेल्या या बाईकचा टॉप स्पीड आहे ताशी २६९ किमी.

huster
पुढच्या वर्षात भारतात अनेक सुपरबाईक लाँच केल्या जाणार आहेत. त्यात भारतीय ब्रँड हिरो त्यांची हस्टर ही सुपरबाईकही सादर करणार आहे. या बाईकची किंमत आहे ४ लाख रूपये. या बाईकला ६२० सीसीचे दोन सिलींडर लिक्विड कूल फोर व्हॉल्ट डीओएचसी पॅरलल ट्विन इंजिन दिले गेले आहे. ही बाईक ३.८ सेकंदात १०० किमीचा वेग घेऊ शकते तसेच तिचा टॉप स्पीड आहे ताशी २४० किमी. बाईकला स्पोर्टी लूक दिला गेला असून ती पिवळ्या व ग्रे रंगाच्या शेडमध्ये मिळेल.

Leave a Comment