आता केंद्र सरकारचा डोळा तुमच्या सोन्यावर

gold
नवी दिल्ली – केंद्र सरकारने पाचशे आणि हजारांच्या नोटा रद्द केल्यानंतर आता आपला मोर्चा सोन्याकडे नेणार असल्याची शक्यता असल्यामुळे सोन्यांची साठवणूक करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.

मात्र, अर्थ मंत्रालयाने सोन्यांच्या अतिसाठवणुकीवर करण्यात येणाऱ्या कारवाईची शक्यता फेटाळली आहे. मागील दोन वर्षात सोने खरेदी करण्यात भारताने मोठी उलाढाल केला आहे. शिवाय, नोटा बंदीनंतर अनेकांनी आपल्या काळा पैशांची विल्हेवाट लावण्यासाठी सोने खरेदी करण्यासाठी गर्दी केली होती. सोने खरेदी करण्यात भारताचा सर्वाधिक दुसरा क्रमांक लागतो. वार्षिक एक हजार टन सोने काळा पैशांतून खरेदी केले जाते. सोन्यावर कर लावता येत नाही, यासाठी सोने खरेदीवर नागरिकांचा भर असतो.

Leave a Comment