सनी लियोनीचे स्वतःचे अॅप येतेय

sunny
बॉलीवूडमध्ये येऊन चांगलीच प्रसिद्धी मिळविलेली बोल्ड अभिनेत्री सनी लियोनी हिच्या फॅन्ससाठी एक चांगली खबर आहे. सनीने ट्विट करून ती स्वतःचे अॅप येत्या सहा दिवसांत लाँच करत असल्याची घोषणा केली आहे. या अॅपमध्ये एक्सक्लुसिव्ह कंटेट म्हणजे स्फोटक मजकूर असेल असेही संकेत दिले गेले आहेत. या अॅपसाठी पूर्वनोंदणी करण्याचे आवाहनही सनीने केले आहे.

गुरगांव येथील एका कंपनीने २०१४ मध्ये सनीचे मोबाईल अॅप लाँच केले होते त्याला चांगल्या प्रतिक्रियाही मिळाल्या होत्या. एका महिन्याच्या अवधीत ते ३ लाखांहून अधिक जणांनी डाऊनलोड केले होते तसेच ते अत्यंत कमी कालावधीत जास्त डाऊनलोड केले गेलेले अॅप म्हणून सिद्ध झाले होते मात्र त्यांत कांही अॅडल्ट कंटेंट असेल या समजुतीने ते डाऊनलोड केलेल्यांच्या पदरी निराशा पडली हेाती. नवीन अॅप काय आणतेय याची उत्सुकता यामुळे अधिक वाढली असल्याचे सांगितले जात आहे.

Leave a Comment