लग्नात कैदी वाजंत्री

band
जयपुर – कारागृहातील कैदी आणि चक्क लग्नाच्या वरातीत बँड वाजवतात असे ऐकले तर तुम्हाला नक्कीच नवल वाटेल. पण हे सत्य आहे. जोधपूर येथील कारागृहातील कैदी न केवळ लग्नात जातात पण येथे ते बँड वाजवून लोकांचे मनोरंजन देखील करतात. त्याच बरोबर हे काम पूर्ण झाल्यानंतर कैदी इमानदारीने कारागृहात परत जातात आणि कैद्यांवर लक्ष ठेवण्याचे काम केवळ एकच हवालदार करतो.

जोधपूरमधील मध्यवर्ती कारागृहातील कैद्यांना बँड वाजवण्याचे प्रशिक्षण दिले जाते. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर या कैद्यांना लग्न अथवा इतर समारंभांमध्ये बँड वाजवण्यासाठी पाठवण्यात येते. या बँड पथकात एकूण १२ वादक कैदी असतात. जेथे एक तास बँड वाजवण्यासाठी इतर वाजंत्री २० ते ३० हजार रुपये बिदागी घेतात. तेथे हे कैदी ताशी १६०१ रुपये ऐवढी बिदागी घेतात. दरम्यान कैद्यांचा हा बँड एवढा लोकप्रिय झाला आहे की या सीझनमध्ये आतापासूनच आगाऊ बुकिंग सुरु झाली आहे. मध्यवर्ती कारागृहात याची बुकिग करावी लागते. बुकिंग करतेवेळी सर्वप्रथम कार्यक्रमाची तारीख आणि वेळ सांगावी लागते आणि या कैद्यांना कार्यक्रमस्थळी घेऊन जाणे आणि परत आणून पोहचविण्याचे काम कार्यक्रम आयोजकाची असते. कारागृह प्रशासनाकडून या कैद्यांना बँड वाजविण्यासाठी विशिष्ट गणवेष दिला जातो. या बँडचे वैशिष्ट्य म्हणजे हा बँड राजस्थान उच्च न्यायालयाच्या कार्यक्रमांमध्ये वाजविला जातो.

Leave a Comment