एचटीसीचा डिझायर टेन प्रो स्मार्टफोन भारतात आला

htc
तैवानी कंपनी एचटीसीने त्यांचा लेटेस्ट स्मार्टफोन डिझायर टेन प्रो भारतात सादर केला आहे. हा फोन डिसेंबरपासून ग्राहकांना मिळू शकणार आहे. फोनची किंमत आहे २६४९० रूपये.

या फोनसाठी ५ इंची फुल एचडी डिस्प्ले कॉर्निंग गोरिल्ला ग्लास प्रोटेक्शनसह दिला गेला आहे. ४ जीबी रॅम, ६४ जीबी इंटरनल मेमरी ती मायक्रोकार्डच्या सहाय्याने २ टीबी पर्यंत वाढविण्याची सुविधा, अँड्राईड मार्शमेलो ६.० वर आधारित एचटीसी सेंस यूआय ओएस, फिंगरप्रिंट सेन्सर, २० एमपीचा एलईडी फ्लॅशसह बॅक कॅमेरा, १३ एमपीचा फ्रंट कॅमेरा, बूमसाऊंड ऑडिओ टेक्नॉलॉजी अशी त्याची फिचर्स आहेत. हा फोन फोरजी, थ्रीजी, वायफाय, जीपीएस अशा कनेक्टीव्हीटी ऑप्शन्ससह आहे.

कंपनीने याचवेळी त्यांचा एचटीसी टेन ईव्ही हा स्मार्टफोन चीनमध्ये लाँच केला आहे. हा फोन भारतात कधी येणार याचा खुलासा केला गेलेला नाही.या फोनला ५.५ इंची क्यूएचडी डिस्प्ले गुरील्ला ग्लास ५ कोटिंगसह दिला गेला आहे. अँड्राईड नगेट ७.० वर आधारित सेंस यूआय ओएस, ३ जीबी रॅम, ३२ जीबी इंटरनल मेमरी, ड्युअल एलईडीसह १६ एमपीचा रियर तर ८ एमपीचा फ्रंट कॅमेरा, फिंगरप्रिंट सेन्सर अशी त्याची फिचर्स आहेत. यालाही वरीलप्रमाणेच कनेक्टीव्हीटी ऑप्शन्स दिली गेली आहेत.

Leave a Comment