५०० च्या जुन्या नोटा वापरासाठी १५ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ

500
चलनातून रद्द केल्या गेलेल्या ५०० व १००० च्या नोटा वापराची मुदत काल मध्यरात्री संपली असतानाच सरकारने ५०० रूच्या जुन्या नोटा वापराची मुदत १५ डिसेंबरपर्यंत वाढवून दिली असून १ हजाराच्या नोटा मात्र वापरातून पूर्णपणे बंद केल्याचे जाहीर केले आहे. ५०० च्या जुन्या नोटा सरकारने पूर्वी सवलत दिलेल्या २० ठिकाणी आता १५ डिसेंबरपर्यंत वापरता येणार आहेत. बँकातून नोटा बदलून घेण्याची मुदतही समाप्त केली गेली असून आता जुन्या नोटा ३० डिसेंबरपर्यंत बँकेत भरता येणार आहेत.

जुन्या ५०० च्या नोटा पेट्रोल, पाणी विज बिले, महापालिका कर, औषधे, रूग्णालये, सरकारी स्टोअर्स, बियाणे खरेदी अशा २० ठिकाणी वापरता येतील तसेच शाळांमधून प्रत्येक विद्यार्थ्याला या नोटांद्वारे २००० रूपयांपर्यंतची फी भरता येईल. दोन डिसेंबरपर्यंत सरकारने टोल माफी दिली आहे मात्र त्यानंतर ३ ते १५ डिसेंबर या काळात या नोटा टोलबुधवरही वापरता येणार आहेत. परदेशी नागरिक दर आठवड्याला त्यांच्याकडचे परकीय चलन बदलून ५००० रूपयांपर्यंत भारतीय चलन घेऊ शकणार आहेत मात्र त्याची नोंद पासपोर्टवर केली जाणार आहे.

Leave a Comment