५००च्या जून्या नोटा १५ डिसेंबरपर्यंत कुठे स्विकारल्या जातील ?

note
नवी दिल्ली: आजपासून पाचशे आणि हजारच्या नोटा केंद्र सरकारच्या निर्णनुसार बॅंकेत बदलून मिळणार नाही. आता थेट बॅंक खात्यात या नोटा जमा कराव्या लागतील. तर हे पैसे तुम्ही एटीएम, बँक स्लीप किंवा चेकद्वारे काढू शकाल. त्यामुळे आता बॅंकांसमोरील रांगा कमी होण्याची शक्यता आहे. मात्र, काही ठिकाणी ५०० च्या नोटा चालणार आहेत.

तेच ग्राहक पुन्हा पुन्हा नोटा बदलण्यासाठी येत असल्याचे बँकांच्या निदर्शनास आल्यामुळे बँकांमध्ये जुन्या पाचशे आणि हजारच्या नोटा बदलून घेता येणार नाहीत. या निर्णयामुळे ज्यांचे बँकेत खाते नाही, अशा नागरिकांना खाते उघडता येईल. या खात्यामध्ये आपल्याकडील जुन्या नोटा जमा करता येतील.

५००च्या नोटा कुठे चालतील ?
* महापालिका, सरकारी शाळांमध्ये दोन हजार रुपयांपर्यंतच्या फीसाठी जुन्या पाचशेच्या नोटा चालतील. त्यासाठी अधिकच्या रकमेसाठी चेकचा वापर करावा.
* प्री पेड मोबाईल रिचार्जसाठी पाचशेच्या नोटा चालतील.
* घरगुती पाणी आणि वीज बिलासाठी जुन्या नोटा स्वीकारल्या जातील.
* वाहतूक मंत्रालयाकडून २ डिसेंबरपर्यंत टोलमाफी देण्यात आली आहे. मात्र ३ डिसेंबर ते १५ डिसेंबरपर्यंत टोल नाक्यांवर जुन्या ५०० च्या नोटा स्वीकारल्या जातील.
जुन्या पाचशेच्या नोटा जीवनावश्यक ठिकाणी म्हणजे पेट्रोलपंप, रुग्णालय, सरकारी कार्यालय, एसटी, रेल्वे स्टेशन अशा ठिकाणी १५ डिसेंबरपर्यंत चालणार आहेत. त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे. मात्र हजारच्या नोटा या ठिकाणी चालणार नाहीत.
पेट्रोलपंप, रुग्णालय, सरकारी कार्यालय, एसटी, रेल्वे स्टेशन अशा ठिकाणी १५ डिसेंबरपर्यंत जुन्या पाचशेच्या नोटा चालणार आहेत. शिवाय प्री पेड मोबाईल रिचार्जसाठी देखील पाचशेची नोट चालणार आहे. सरकारी शाळांची फी भरण्यासाठीही पाचशेच्या नोटा चालतील.

Leave a Comment