निओ ईपी ९ – चीनची जगातील सर्वात वेगवान इलेक्ट्रीक कार

nioep
चीनी इलेक्ट्रीक कार उत्पादन कंपनी नेक्स्ट ईव्हीने जगातील सर्वात वेगवान इलेक्ट्रीक कार सादर केल्याचा दावा केला असून ही कार लंडनच्या आर्ट गॅलरीत लाँच करण्यात आल्याचे समजते. ही कार फेरारी व मॅक्लेरेन सारख्या हायब्रिड कार्सना तगडी टक्कर देईल असाही कंपनीचा दावा आहे.

कंपनीच्या म्हणण्यानुसार ही कार ७.१ सेकंदात २५८ किमीचा वेग पकडू शकते व तिचा टॉप स्पीड आहे ताशी ३१२ किमी. या कारला १३६० एचपीचे इंजिन दिले गेले आहे. कारला इंटरचार्जेबल बॅटरी आहे. ४५ मिनिटे चार्ज केल्यानंतर ती ४२० किमीचे अंतर कापू शकते. कारला देखणा स्पोर्टी लूक दिला गेला आहे. कारच्या किमतीबाबत माहिती मिळू शकलेली नाही.

Leave a Comment