डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात लॉन्च होणार ‘वनप्लस ३ टी’ !

oneplus
मुंबई – अमेरिका आणि यूरोपमध्ये लॉन्च करण्यात आलेल्या ‘वनप्लस ३ टी’ या स्मार्टफोनला मिळालेला प्रतिसाद बघता आता हा स्मार्टफोन भारतात लॉन्च करण्याची तारीख ठरवण्यात आली आहे. या स्मार्टफोनमध्ये प्रोसेसर आणि फ्रंट कॅमेरा यावर कंपनीने अधिक भर दिली आहे. हा स्मार्टफोन डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात बाजारात येणार आहे.

भारतीय बाजारपेठेत अमेरिका आणि यूरोपच्या बाजारपेठेत दाखल झालेला स्मार्टफोन लवकरच दाखल होईल, असे संकेत दिल्यानंतर कंपनीचे व्यवस्थापक विकास अग्रवाल यांनी ट्विटरवरुन स्मार्टफोन लॉचिंगच्या भारतातील मुहूर्ताचा खुलासा केला आहे. २ डिसेंबरला ‘वनप्लस ३ टी’ स्मार्टफोन भारतीय बाजारपेठेत दाखल होईल. स्मार्टफोन बाजारात दाखल करण्यापूर्वी वनप्लसने फेसबुकच्या माध्यमातून ‘टुथ आणि डेअर’ च्या माध्यमातून कौल जाणून घेतला होता.

कंपनीने भारतीय ग्राहकांमध्ये नव्या स्मार्टफोनविषयी असणारी उत्सुकता लक्षात घेऊन अखेर स्मार्टफोनच्या लॉन्चिंगचा खुलासा केला. ‘वनप्लस ३ टी’ ६४ जीबी ४३९ डॉलर म्हणजेच २९,८०० रुपये आणि १२८ जीबी मॉडल ४७९ डॉलर म्हणजेच ३२,५००रुपये मध्ये उपलब्ध होईल. ‘वनप्लस ३’ आणि ‘वनप्लस ३ टी’ या दोन स्मार्टफोनमध्ये तुलना केल्यास नवीन स्मार्टफोनचा प्रोसेसर अधिक असल्याचे दिसते. स्नॅपड्रॅगन ८२१ प्रोसेसरचा वापर या स्मार्टफोनमध्ये करण्यात आला आहे. नवीन ‘स्मार्टफोन ‘वनप्लस ३ टी’ ६४ जीबी आणि १२८ स्टोरजसह उपलब्ध आहे. तर ‘वनप्लस ३’ केवळ ६४ जीबी स्टोरेजसह उपलब्ध आहे.

या स्मार्टफोन कंपनीने प्रोसेसरसह कॅमरावर अधिक भरत दिला असून या स्मार्टफोनच्या कॅमेऱ्याचे रिझॉलेशन दुप्पट असल्याचे दिसते. ‘वनप्लस ३ टी’ मध्ये १६ मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. तर ‘वनप्लस ३’ मध्ये ८ मेगापिक्सल फ्रंट कॅमेऱ्याचा समावेश आहे. याव्यतिरिक्त ‘वनप्लस ३ टी’ ३४०० एमएएएच बॅटरी असून ‘वनप्लस ३’ मध्ये ३००० एमएएच की बॅटरी उपलब्ध असून या स्मार्टफोन डॅश चार्ज फास्ट चार्जिंग तंत्रज्ञानाला सपोर्ट करणारा आहे.

Leave a Comment