सोन्याचे दर घसरले

gold
मुंबई : सोन्याच्या दरात नोटाबंदीच्या १६व्या दिवशी मोठी घसरण पाहायला मिळत आहे. ०.२२ टक्क्यांची सोन्याच्या दरात घसरण होत ते प्रतितोळा २८ हजार ७६६ रुपयांपर्यंत घसरले आहेत. डॉलर मजबूत झाल्याने त्याचा परिणाम सोन्या-चांदीच्या किंमतीवर झाला आहे. सोन्यासह चांदीच्या दरातही घसरण पाहायला मिळत आहे. चांदीचे दरही २४६ रुपयांनी घटून प्रति किलो ४०,२८० रुपयांवर आले आहेत. नोटाबंदीनंतर सोन्याच्या दरात ही मोठी घसरण आहे.

Leave a Comment