रिलायन्सच्या टिव्ही व्यवसायाची झी समुहाकडून खरेदी

relaz
रिलायन्स कॅपिटलच्या टीव्ही व्यवसायाची झी समुहाने खरेदी केली असून रिलायन्सच्या रेडिओ व्यवसायाचा ५१ टक्के भागही याच समुहाने घेतला आहे. या दोन्ही व्यवहारांपोटी रिलायन्स कॅपिटल्सला १९०० कोटी रूपये दिले जाणार असून या पैशांचा विनियोग कर्ज कमी करण्यासाठी केला जाणार असल्याचे सीईओ सॅम घोष यांनी सांगितले. घोष म्हणाले आमचा हा निर्णय शेअरधारकांच्या हिताच्या दृष्टीनेही महत्त्वाचा ठरणार आहे.

रेडिओ व्यवसायात झी समुहाबरोबरच्या भागीदारीने आम्ही समाधानी आहोत असेही घोष यांनी सांगितले. याचवेळी झी मिडीया कॉर्पचे सीईओ राजीवसिंह यांनी रिलायन्सशी भागीदारी आमच्यासाठीही महत्त्वाची असल्याचे सांगून यामुळे जादा दर्शकांपर्यंत पोहोचण्यात आम्हाला मदत होणार आहे असे स्पष्ट केले.

Leave a Comment