स्विस बँकांतील भारतीय खातेदारांची माहिती मिळणार

ubs
काळ्यापैशाविरोधात केंद्र सरकारने पुकारलेल्या युद्धाचे पुढचे पाऊल टाकले गेले असून भारत सरकार व स्वित्झर्लंड सरकार यांच्यात ऑटोमेटिक एक्स्चेंज ऑफ इन्फर्मेशन करारावर सह्या केल्या गेल्या आहेत. अर्थात भारत सरकारला स्विस बँकांत ज्या भारतीयांनी पूर्वीच खाती उघडली होती त्यांची माहिती मिळणार नाही मात्र २०१८ पासून उघडल्या गेलेल्या सर्व खात्यांसंदर्भातली माहिती मिळू शकणार आहे. भारतीयांचा प्रचंड प्रमाणातला काळा पैसा स्विस बॅकात असल्याचा संशय सरकारला आहेच. मात्र यापुढे तरी निदान असा काळा पैसा स्विस बँकातून साठविण्यापूर्वी संबंधितांना विचार करावा लागणार आहे.

या करारानुसार २०१८ पासून दोन्ही देश एकत्रित डेटा गोळा करतील व २०१९ पासून या डेटाची गरजेनुसार देवाणघेवाण केली जाईल. अर्थात या संदर्भात भारताला गुप्तता पाळावी लागणार आहे मात्र मिळालेली माहिती आयकर विभागाला देऊन काळा पैसा संदर्भातील तपास सुलभ होणार आहे. असे समजते की पंतप्रधान मोदी व स्वित्जर्लंडचे राष्ट्रपती जोहान श्वायडर अम्मान यांच्यामध्ये ६ जून रोजी झालेल्या बैठकीतच या संदर्भातली चर्चा केली गेली होती.

Leave a Comment