सोनपूर मेळ्यात थिएटरची धमाल

sonepur
जगप्रसिद्ध हरद्वार क्षेत्र पशुमेळ्याला बिहारच्या सोनपूर येथे २३ नोव्हेंबरला सुरवात झाली असून दरवर्षीप्रमाणे यंदाही या जत्रेचे वैशिष्ठ ठरलेली थिएटर यंदाही धमाल माजवितील असे संकेत मिळत आहेत. गंगास्नानाने सुरू होणारी ही जत्रा सोनपूर मेळा नावाने प्रसिद्ध असून सोनपूर ते हाजीपूर या भागात कित्येक किलोमीटरमध्ये ती पसरलेली असते. या मेळ्याचे वैशिष्ठ्य असेही सांगितले जाते की येथे सुईपासून हत्तीपर्यंत कोणतीही वस्तू विकत घेता येते.

या जत्रेत अनेक प्रकारचे बाजार लागतात. पशुबाजारात गाई, म्हशी, बैल, घोडे, विविध प्रकारचे पक्षी असतात तसेच मीनाबाजारात लहान मुलांसाठी खेळणी व घरगुती वापराच्या वस्तू असतात. कपडे, सजावटीच्या वस्तू, हस्तकलेचे विविध प्रकार याचबरोबर लाकूड बाजारात काडेपेटीपासून ते छपरी पलंगापर्यंत सर्व कांही मिळते. यासोबत लोकनृत्ये, कव्वाली, गायनाचे कार्यक्रम असतात व सर्कस, झुले ही करमणुकीची साधनेही असतात. परदेशी पर्यटक येथे खूप गर्दी करतात व त्याच्यासाठी स्विस कॉटेजेस उभारल्या जातात.

sonepur2
या मेळ्याचे खास आकर्षण असते ती थिएटर म्हटली जाणारी संगीत बारी. थोडक्यात आपल्याकडचे तमाशे. मात्र या थिएटरमध्ये मुख्यतः अश्लल नृत्ये केली जातात व त्यात बारबालांच्या स्टाईलच्या नृत्यांचा भरणा असतो. सायंकाळी सुरू होणार्‍या या बार्‍या रात्री १२ च्या पुढे चांगल्याच रंगतात व येथे लहान मुलांना प्रवेश दिला जात नाही. तरूणवर्गाची गर्दी येथे लक्षणीय असते व त्यासाठी ५०० ते १००० रूपयांची तिकीटेही असतात. यंदा अशी ९ थिएटर या जत्रेत आली आहेत मात्र नोटबंदीमुळे तिकीटांना कसा प्रतिसाद मिळणार याची चिंता आयेाजकांना सतावते आहे.

Leave a Comment