लार्सन अँड टुब्रोचा १४ हजार कर्मचाऱ्यांना नारळ

lt
मुंबई : भारतातील ‘लार्सन अँड टुब्रो’ कंपनीतून कर्मचाऱ्यांची कपात करण्यात येत असून एकूण कर्मचारीसंख्येपैकी सुमारे १४ हजार जणांना कंपनीतून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. अलिकडच्या काळातील ही सर्वात मोठी कर्मचारीकपात (लेऑफ) मानली जात आहे.

कंपनीतील वर्कफोर्स व्यवसायात आलेल्या मंदीमुळे योग्य आकड्यावर आणण्याची गरज होती. त्यामुळेच हा निर्णय घेण्यात आल्याचे ‘लार्सन अँड टुब्रो’ कंपनीतर्फे सांगण्यात आले आहे. डिझीटायजेशन आणि उत्पादकता वाढवण्यासाठी केलेल्या प्रयत्नांमुळे काही कर्मचाऱ्यांना कमी करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. यासंदर्भातील वृत्त ‘इकॉनॉमिक टाइम्स’ने दिले आहे. योग्य कर्मचाऱ्यांची निवड करण्यासाठी कंपनीतर्फे मोठ्या प्रमाणावर प्रयत्न करण्यात आले. एप्रिल महिन्यात एल अँड टी फायनान्स कंपनीने साडेपाचशे कर्मचाऱ्यांना नारळ देण्यात आला होता.

Leave a Comment