दुचाकी आता सीएनजीवर धावणार

cng
पुणे – एकेकाळी पुण्याची ओळख सायकलीचे शहर म्हणून होती. मात्र आज मितीस या शहराची ओळख दुचाकीचे शहर म्हणून होऊ लागली आहे. पेट्रोलवर धावणाऱ्या दुचाकीसोबत आता सीएनजीवर दुचाकी धावणार आहे. राज्यातला हा पहिलाच उपक्रम आहे.

देशात वाढत्या प्रदुषणाच्या शहरांमध्ये पुण्याचा तिसरा क्रमांक लागतो. या शहरामध्ये ३७ लाख फक्त दुचाकीची नोंद झाली आहे. त्यामुळे शहरात दुचाकीची गर्दी होवू लागली आहे. रस्ते अपुरे पडल्याने प्रसंगी शहरात ठिकठिकाणी वाहतूककोंडीसह वायु प्रदुषणाला पुणेकरांना सामोरे जावे लागत आहे. यातून पुणेकरांची सुटका करण्यासाठी महाराष्ट्र नॅचुरल गॅस आणि आयटुक या कंपनीने दुचाकीवर मोपेड किट बसवले असून यामध्ये एक किलोचे दोन सिंलेडर असणार आहेत.

यामध्ये एक किलोमध्ये ६५ किलोमीटर इतके अॅवरेज मिळणार आहे. शिवाय याचा मेटेंनन्स खर्चही कमी लागतो. यामध्ये गॅस संपल्यास पेट्रोलचाही वापर दुचाकीस्वाराला करता येणार आहे. पेट्रोलच्या तुलनेत गॅसचा दरही निम्मा असल्याने नागरिकांचा पेट्रोलवर होणारा खर्चही निम्म्यावर येईल. प्रायोगिक तत्वावर हा प्रयोग राज्यात पुण्यामध्ये सुरू करण्यात आला. प्रतिसाद वाढल्यानतंर शहरात एमएनजीएलच्या माध्यामतून सेंटर वाढवले जातील. शहरातील संगवाडी इथल्या आरटीओच्या मुख्य कार्यालयासमोरील भारत पेट्रोल पंपमध्ये एमएनजीएलचे दोन युनिट बसवण्यात आले आहेत. या उपक्रमाचे उद्घाटन पुणे आरटीओचे मुख्य बाबासाहेब आजरी यांच्याहस्ते झाले.

यावर बोलताना ते म्हणाले, की या गाड्यांच्या पासिंगसाठी कोणतीही वेगळी प्रक्रिया नसून अधिकृत डिलरकडून हे किट बसवून घेतले पाहिजे. त्यानतंर दुचाकी रस्त्यावर फिरू शकते. यामध्ये कोणताही धोका नसून एआरएआय नेही यांची चाचणी घेतली असून त्यांनी हिरवा कंदील दाखवल्यानतंर पुण्यात प्रायोगिक तत्वावर या गाड्या सुरू करण्यात आल्या आहे. नागरिकांचा प्रतिसाद वाढल्यानतंर याचा फायदा शहरातील प्रदुषणाची पातळी कमी होण्यास मदत होणार आहे, असे पुणे आरटीओ प्रादेशिक परिवहन अधिकारी बाबासाहेब आजरी यांनी सांगितले.

Leave a Comment