सुपरकपॅसिटर मुळे इलेक्ट्रिक कार व स्मार्टफोन क्षेत्रात क्रांती

capasita
भारतीय वंशाचे नितीन चौधरी यांनी त्यांच्या अन्य संशोधकांच्या टीमसह तयार केलेल्या सुपरकपॅसिटरमुळे स्मार्टफोनचे चार्जिंग कांही सेकंदात होऊ शकणार आहे. फ्लोरिडा विद्यापीठात या संशोधकांच्या टीमने असा कपॅसिटर तयार केला असून त्यामुळे स्मार्टफोन चार्जिंगच नाही तर इलेक्ट्रीक कार क्षेत्रातही क्रांती घडून येईल असा दावा केला जात आहे.

सध्या असलेल्या सुपरकपॅसिटरच्या तुलनेत हा नवा कपॅसिटर ३० हजार पटीने वेगवान आहे. तो बनविताना नवी प्रक्रिया वापरली गेली आहे व त्यासाठी टूडी मटेरियलचा वापर केला गेला आहे. अत्यंत सोप्या रासायनिक संयुगांचा वापर केल्याने हा कपॅसिटर अत्यंत उपयुक्त ठरल्याचे संशोधकांचे म्हणणे आहे.या कपॅसिटरवर फोन चार्ज केला की पुन्हा आठवडाभर तो चार्ज करण्याची गरज राहात नाही.अन्य संशोधकांनी यापूर्वी ग्रेफीन व टूडी मटेरियलचा वापर करून असे कपॅसिटर बनविले होते मात्र त्यांना मर्यादित यश मिळाले होते असेही समजते.

Leave a Comment