जिल्हा सहकारी बँकांना नाबार्डकडून २१ हजार कोटीची मदत

shaktikant-das
नवी दिल्ली – केंद्र सरकारकडून नोटाबंदी निर्णयाच्या पार्श्वभूमीवर शेतक-यांसाठी दिलासादायक बातमी देण्यात आली असून नाबार्डकडून नोटाबंदीमुळे मेटाकुटीला आलेल्या सर्वसामान्य शेतक-यांसाठी जिल्हा सहकारी बँकांना २१ हजार कोटी रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. केंद्रीय अर्थसचिव शक्तिकांत दास यांनी या निर्णयाची घोषणा केली.

समान स्वरुपात सर्व जिल्हा बँकांना रकमेचे वाटप होईल, याची काळजीची घेण्याचा सल्लाही नाबार्ड आणि आरबीआय देण्यात आल्याचे शक्तिकांत दास यांनी सांगितले. जिल्हा सहकारी बँकांना नोटाबंदीमुळे ५०० आणि १००० रुपयांच्या जुन्या नोटा स्वीकारण्यास मनाई करण्यात आली होती. यामुळे सर्वसामान्य शेतकरी हतबल झाला होता. मात्र, नाबार्डकडून मिळणा-या आर्थिक मदतीमुळे शेतक-यांना दिलासा मिळाला आहे

Leave a Comment