एटीएमच्या रांगेत लागायचेय? छोटूला बोलवा

chotu
नोटबंदी निर्णयामुळे बँका व एटीएमच्या रांगेत उभे राहणे हा रोजच्या कामाचाच एक भाग बनला आहे मात्र दररोज कामधाम सोडून तासनतास रांगेत प्रतीक्षा करणे अनेकांना जड जाते आहे. त्यांच्यासाठी बुक माय छोटू या इंडियन स्टार्टअपने त्यांच्या सेवेचा विस्तार केला आहे. आजपर्यंत घरकामात मदत, स्वच्छता, बाजारहाट, शिफ्टिंग, पार्टीत मदत यासाठी दिली जात असणारी ही सेवा आता एटीएमच्या रांगेत उभे राहून नंबर लावण्यासाठी दिली जात आहे. त्यासाठी तासाला ९० रूपये चार्ज केले जात असून ही सेवा सध्या फक्त हरियाणा, दिल्ली व यूपीमध्ये दिली जात आहे. अनेकांचे लक्ष या सेवेने वेधून घेतले असल्याचेही समजते.

या स्टार्टअपचे मालक संजितसिंग बेदी सांगतात, एक लक्षात घ्या आमचा छोटू म्हणजे लहान मुलगा नाही तर ही सेवा देण्यासाठी जे लोक नेमले गेले आहेत ते सर्व १८ वर्षांच्या वरचे आहेत. तुम्ही ऑनलाईनवर छोटूसाठी बुकींग केलेत की तुम्हाला कन्फर्मेशन दिले जाते. मात्र आमचे छोटू रांगेतच नंबर लावतात, आत बँकेत जात नाहीत. सध्या नोटबंदी मुळे उद्भवलेली परिस्थिती लक्षात घेतली तर अनेकांना ही सेवा उपयुक्त ठरू शकणार आहे. तासांनुसार त्यांचे दर ठरविले गेले आहेत. आमचे छोटू अगदी आठ तासांसाठी सुद्धा रांगेत उभे राहतील. यामुळे तुमची अन्य कामे उरकून तुम्ही एटीएमचे काम वेळ न घालविता करू शकता.

Leave a Comment