‘आयफोन’ला क्रॅश करतो ‘हा’ व्हिडिओ

i-phone
आयफोनच्या स्मार्ट फोन्सवर एक विशिष्ट लिंक उघडून त्यावरील व्हिडिओ पाहिल्यानंतर तो फोन क्रॅश करतो. अर्थात त्यामुळे फोन कायमस्वरूपी निकामी होत नाही. रीसेट आणि रीबूट करून तो दुरुस्त करता येतो.

‘सीना विबो’च्या ‘मियाओपाई’ या ‘व्हिडिओ शेअरिंग अॅप’वरील हा व्हिडिओ उघडून पाहिल्यानंतर फोनचा वेग कमी होत जातो आणि अखेर फोन क्रॅश होतो. हे अॅप, होम स्क्रीन अथवा काळ्या स्क्रीनवर लॉक होऊन जातो. विशेषत: आयफोन ४, ५, ७ हे फोन लवकर लॉक होतात.

मात्र यामुळे फोन कायमस्वरूपी निकामी होत नाही; तर रीसेट आणि रीबूट करून तो दुरुस्त करता येतो.

Leave a Comment