नोटांबदीमुळे सिगारेटची विक्री ४० टक्क्यांनी घसरली

cigarate
नवी दिल्ली – सिगारेटच्या विक्रीवर आतापर्यत सिगारेटच्या पाकिटावर देण्यात आलेला वैधानिक इशारा तसेच जाहिराती यांचा काहीच परिणाम झाला नाही. मात्र सिगारेट विक्रीवर नोटाबंदीमुळे चांगलाच परिणाम झालेला दिसत आहे. याबाबत शहरातील पानटपरी चालवणारे आणि व्यापा-यांनी दिलेल्या माहितीनुसार सिगारेटच्या विक्रीत तब्बल ४० टक्क्यांनी घट झाली आहे.

रोजचे ग्राहकदेखील सुट्टे पैसे नसल्याने आपल्या सवयीवर ताबा ठेवून असल्याचे दुकानदारांनी सांगितले आहे. एका पानटपरीवाल्याने दिलेल्या माहितीनुसार नोटाबंदीची घोषणा झाल्यानंतर पहिल्या चार दिवसांमध्ये मी एकही सिगारेट विकू शकलो नाही. नंतर विक्री होऊ लागली, मात्र ८ नोव्हेंबर आधी होणा-या विक्रीशी तुलना करता ४० टक्क्यांनी घसरण झाली आहे.

Leave a Comment